trending_up TRENDING:

खोट्या सह्यांनी थेट पूल उभारण्यास मंजुरी !

सिंचन भवनातूनच 'बोगस' कारभार, बडे मासे गळाला लागणार?

person
खोट्या सह्यांनी थेट पूल उभारण्यास मंजुरी !

पुणे – जलसंपदा विभागाच्या नावाने बनावट शासकीय मंजुरीपत्र तयार करून पुण्यातील एका नामांकित डेव्हलपर कंपनीची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण गैरव्यवहारात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या एका सहायक अधीक्षक अभियंत्याचा थेट सहभाग असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंचन भवन


याप्रकरणात राजेंद्र विष्णू सावंत, सहायक अधीक्षक अभियंता, सिंचन भवन, मंगळवार पेठ, पुणे आणि गौरव देवराव डहाळे कन्सल्टंट यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी श्रीजीत प्रवीण थोरात यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार ७ जानेवारी ते ११ जुलै या कालावधीत घडला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कन्ट्रक्शनमध्ये काम करणाऱ्या पुण्यातील एका नामांकित कंपनीला मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथील कासारसाई डाव्या कालव्यावर स्वखर्चाने पूल उभारणी करायची होती. शासकीय नियमांनुसार, यासाठी जलसंपदा विभागाची रीतसर परवानगी आवश्यक होती. हे काम करून घेण्याची जबाबदारी कंपनीने कंत्राटदार गौरव डहाळे याच्यावरकन्सल्टंट म्हणून सोपवली होती.


काम लवकर पदरात पाडून घेण्यासाठी कंत्राटदार गौरव डहाळे आणि महामंडळाचे अधिकारी राजेंद्र सावंत यांनी हातमिळवणी केली. दोघांनी संगनमत करून थेट जलसंपदा विभागाच्या नावाने एक हुबेहूब बनावट मंजुरीपत्र तयार केले. त्यावर विभागाचा खोटा जावक क्रमांक टाकला आणि वरिष्ठ खोट्या अधिकाऱ्यांच्या सह्या देखील केल्या. हे पत्र अधिकृत असल्याचे भासवून ते कन्स्ट्रक्शन कंपनीला सुपूर्द करण्यात आले.


कंपनीकडून जेव्हा या कामाच्या कागदपत्रांची अंतिम पडताळणी सुरू होती, तेव्हा जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या मंजुरीपत्राबाबत संशय आला. सखोल तपासणी केली असता, हे पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे आणि त्यावर वरिष्ठांच्या खोट्या सह्या असल्याचे उघड झाले. सरकारी यंत्रणेचा वापर करून असा बोगस कारभार केल्याचे समोर येताच विभागात एकच खळबळ उडाली.


या गंभीर प्रकरणाची दखल घेत समर्थ पोलिसांनी फसवणूक, सरकारी दस्तऐवजांमध्ये फेरफार आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलीस निरीक्षक चेतन मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Dainik Loknisht

Dainik Loknisht हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

Chakan MIDC: चाकणमध्ये उद्योगांच्या बाबतीत जे घडतय तसं होऊ नये म्हणून राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
Pune

Chakan MIDC: चाकणमध्ये उद्योगांच्या बाबतीत जे घडतय तसं होऊ नये म्हणून राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

Chakan MIDC Problem: चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्ते हे वाहतूक करण्या इतपतही योग्य नसल्याने उद्योजक प्रचंड नाराज होते. रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यामुळे वाहतुकीला रोज मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे.

पुणे मेट्रोचा विस्तार: हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग २०२७ पर्यंत पूर्ण होणार
Pune

पुणे मेट्रोचा विस्तार: हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग २०२७ पर्यंत पूर्ण होणार

पुणे मेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचे काम वेगाने सुरू असून २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता.

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या